ज्येष्ठ चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पणजी- आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि दमदार आवाजाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात सिंहगड पायथ्याजवळील डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी ४५ मिनिटांहून अधिक वेळ त्यांना वाचवण्याचा (CPR) आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नाना पाटेकर यांनी केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने अधिराज्य गाजवले नाही, तर ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठी मदत करून सामाजिक बांधिलकीही जपली होती. त्यांच्या या अकस्मात जाण्याने मनोरंजन विश्वासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात सिंहगड पायथ्याजवळील डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ज्युनियर एनटीआर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, कियारा अडवाणी आणि रकुल प्रीत सिंग यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले.
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
परिंदा सिनेमाने नानांसाठी हिंदी सिनेमाची दारे उघडली
1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.






