ब्रेकिंग न्यूज

एच. ए. स्कूल १९८७ बॅच माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन ‘ संपन्न

Share

पिंपरी – वाढते सायबर गुन्हे रोखणे त्यावरील उपाय योजना तसेच आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयावर चर्चासत्र आयोजित करून तसेच ज्या विद्यालयात आपण शालेय शिक्षण घेतले त्या एच.ए. शाळेला मदत करणे या उदात्त हेतूने एकत्रीत येऊन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन चिंचवड स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाले. अनेकांच्या सुख-दु:खात सामिल होऊन सर्वाना मदत करीत मित्र -मैत्रीणींना येणाऱ्या समस्या , अडचणी सोडविण्यासाठी सर्वजण ३७ वर्षांनंतरही सहकार्य करीत असतात. उपस्थित मित्र -मैत्रीणींना शाळेतील उपक्रमची माहिती देणे हा यामागील मुख्य उद्देश होता.

सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन तसेच बॅच लावून केले. मंदा कंद , अंजली रामायणी , शकिला बागवान , सुरेंद्र मोरे , सुनील पवार , महेश घोसाळकर प्रकाश तेलंगी , केशव देशपांडे , महेंद्र उमराणी यांनी केले. दिप प्रज्वलन – चंद्रकांत डुंबरे , प्रताप सावंत , उमेश सुरवाडे , युवराज फाळके , लिना कट्टी , राजश्री कलापुरे यांच्या हस्ते झाले. सरस्वती पूजन – विजयकुमार तांबे ( PSI ) , अभय पिंपळीकर , बापू गायकवाड , महेश बडवे , पूर्वा ओक , अर्चना माने , मेधा पानसे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेश वंदना शैलेश भावसार आणि राजेश चिट्टे यांनी गायली .

शाळेतील आणि मित्र परिवारातील दिवंगत व्यक्तींना ,‌ नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दुपारच्या सत्रात विविध गुण‌ दर्शन , नृत्य ,‌ खेळ तसेच मराठी , हिंदी चित्रपटातील गाणी गायन झाले. गायक – शैलेश भावसार ,‌ राजेश चिटृॆ , सुधीर भोसले , राहुल गुजर उमाकांत सोनवणे , सुनील पवार , नितीन सावंत , तसेच गायिका निलाबंरी जाधव अनिता कदम ,‌अ‍ॅड मनिषा गवळी , यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

एच. ए.शाळेतील १९८७ बॅचचे माजी विद्यार्थी नियमितपणे भेटून ३७ वर्षेऻ नंतरही शाळेविषयीची आपुलकी , कृतज्ञता , आणि शाळेला मदत करण्याची भावना ठेवूनच अखंडितपणे काम करीत असतो. आमची प्रेरणा इतरांनी घेऊन आपल्या शाळेला आणि गरजू मित्रांना मदत करावी हीच यामागची भावना असल्याचे मत मोहन बाबर यांनी व्यक्त केले . आभार सुनील गाडगीळ याने मानले.