वकील असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय ट्विट केले ?

पुणे- मुंबईत काल दोन दसरा मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तत्पूर्वी सकाळीच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांचा शेवटचा दसरा मेळावा ठरू शकतो असे विधान त्यांनी केले. न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करेल, असा त्यांचा अंदाज आहे, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
‘पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको! आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक! लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे! कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!’ अशी थेट प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी ट्विटमधून व्यक्त केली आहे.
वकील असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय ट्विट केले ?
पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको!
आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक!
लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे!
कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!— Asim Sarode (@AsimSarode) October 19, 2026
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस ही सुनावणी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत शिवसेना ठाकरेंचीच असल्याचा युक्तिवाद केला आहे. त्यावर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनीही सर्वोच्च न्यायालयात आक्रमकपणे शिंदे गटाची बाजू मांडली आहे. त्यामुळे हा निकाल प्रत्येक राजकीय पक्षामधील वाद सोडवण्यात महत्वाचा आधार ठरणार आहे.






