बारामती-दहीहंडी उत्सवासाठी बारामतीकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या तीन तरुणांची दुचाकी घसरल्यामुळे झालेल्या अपघातात का तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत गौरव चव्हाण (वय 18, रा. आमराई, बारामती) याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील आमराई परिसरातील तीन तरुण दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. दिवे घाटात दुचाकी आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. यामध्ये तिघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली गौरव चव्हाण आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी तरुणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
