पुणे रेल्वे स्थानकावर एक ते १५ नोव्हेंबर दरम्यान फक्त ‘याच’ लोकांना मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

पुणे रेल्वे स्थानकावर एक ते १५ नोव्हेंबर दरम्यान फक्त ‘याच’ लोकांना मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट
Share

पुणे – दिवाळी आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने सणानिमित्त प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि छठ सणानिमित्त अनेक नागरिक रेल्वेने आपल्या गावी जातात. त्यामुळे स्टेशनवर प्रवासी आणि त्यांना सोडण्यासाठी खूप गर्दी होत असते. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मदत करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना फलाट तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानकावर प्रवाशांसोबत येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशावर नियंत्रण राहणार आहे.

ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, लहान मुले आणि निरक्षर प्रवाशांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींना प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातील; तसेच, स्वतःच्या प्रवासाचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे करू न शकणाऱ्या आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांसोबत येणाऱ्या व्यक्तींनाही ही तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Vedh News