पुणे – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या सिनेमातील गाजलेली व्यक्तीरेखा म्हणजे पिट्याभाई. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते रमेश परदेशी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून प्रवेशानंतर भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेश संयोजकपदी अभिनेते रमेश परदेशी यांची निवड झाली आहे.
रमेश परदेशी निवड झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘अभिनंदन रमेश….भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेश संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते आणि माझे मित्र रमेश परदेशी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक क्षेत्राचं उत्तम संघटन होऊन पार्टीचा विचार सर्व घटकापर्यंत पोहोचेल, हा विश्वास आहे. निवड झाल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते आणि माझे मित्र रमेश परदेशी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,असे देखील मोहोळ यांनी म्हटले आहे.
रमेश परदेशी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘बेरीज वजाबाकी’ आणि अजय देवगण याच्या ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
