ब्रेकिंग न्यूज

पुणे रेल्वे स्टेशनवर लूटमार, रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून ५ लाखांचा ऐवज लुटला

पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून, हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल असा एकूण ४,९१,६२५ रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री १ च्या सुमारास घडली. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलोनी मुंढवा…

Read More

माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा – हर्षवर्धन पाटील

पिंपरी-जीवनातील महत्त्वाची चार वर्षे अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी द्यावी लागतात. पीसीयू मधील उच्च विद्या विभूषित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा पाया उभारावा, त्यासाठी पीसीईटीने गुणवत्ताधिष्ठित शिक्षणव्यवस्था उभारली आहे, त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करावे असे मार्गदर्शन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते,…

Read More

औद्योगिक विस्ताराला चालना देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभी राहणार ७४३ हेक्टरवर महाकाय एमआयडीसी

पुणे- पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला नवीन चालना मिळाली असून शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टर क्षेत्रावर भव्य नवीन एमआयडीसी (MIDC) उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिकृतपणे जमीन संपादनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. पाबळ-धामारी परिसरातील एकूण ७४३ हेक्टर (सुमारे १८३६ एकर) जमिनीवर ही वसाहत उभी…

Read More

किरकोळ कारणावरून केला मित्राचा खून, आरोपीचा देखील झाला मृत्यू

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये, शिंदे गाव (ता. खेड) येथे घडली. चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. अमरूष उरानो…

Read More

भोसरी गावठाणात भाजप उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार

पिंपरी- विकासात्मक हिंदुत्वाचा विचार घेऊन पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प राबवले. मागील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील भाजपा युवा नेते रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भाजपचे खाते उघडले आहे. भोसरी गावठाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत, भोसरी गावठाण परिसरातील सर्व…

Read More

ब्राझीलच्या शिष्टमंडळाचा भारत दौरा, पुणे-स्थित भारतीय सामाजिक संस्था – “अराउकेरिया डेक्कन इंटरनॅशनल फाउंडेशन” सोबत सहकार्याची घोषणा

पुणे – पराना राज्य (ब्राझील) येथील एका उच्च-स्तरीय शिष्टमंडळाने, ज्याचे नेतृत्व अराउकेरिया फाउंडेशनचे (पराना राज्य सरकारच्या निधी देणारी संस्था, ब्राझील) अध्यक्ष  रामिरो वारहाफ्टिग यांनी केले, आणि ज्यात संचालक सुश्री क्रिस्टियान, डॉ. जॉर्ज एडिसन रिबेरो यांचा समावेश होता, त्यांनी भारतीय सामाजिक संस्था “अराउकेरिया डेक्कन इंटरनॅशनल फाउंडेशन” सोबत एका महत्त्वपूर्ण सहकार्याची घोषणा करण्यासाठी भारताला भेट दिली. हा…

Read More

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी (प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या…

Read More

‘गुलकंद’मध्येही हास्यजत्रेच्या विनोदांची स्वच्छता अन् शुध्दता , नाच-गाणी, धमाल किस्से, हास्य फटाक्यांनी रंगल्या दिग्गजांच्या गप्पा

पिंपरी-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला मनस्वी आनंद तर दिलाच, उत्तम आरोग्यही दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली, तेव्हा प्रत्येकजण दु:खाच्या खाईत लोटला गेला होता. अशा संकटकाळात हास्यजत्रेने आधार दिला. स्वच्छ आणि शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी तीच विनोदातील स्वच्छता आणि शुध्दता गुलकंदमध्येही आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड…

Read More

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती द्या, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

चाकण – चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात…

Read More

वाहनधारकांनो सावधान ! चलन मिळाल्यानंतर ‘इतक्या’ दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा…

नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल. नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार…

Read More