ब्रेकिंग न्यूज

पुण्यात धावत्या पीमपी बसने घेतला पेट, अग्निशामक दलातील जवानाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

Share

पुणे – पीमपी बसने अचानक पेट घेतल्याची घटना शिवाजीनगर भागात शुक्रवारी सकाळी घडली. रात्रपाळीहून घरी निघालेले अग्निशामक दलाचे जवान सुरेश पवार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावर धावणारी पीएमपी बस शिवाजीनगर परिसरातून निघाली होती. अचानक बसच्या मागच्या बाजूने धूर निघू लागला. त्याचवेळी अग्निशामक दलाच्या कसबा पेठ केंद्रातील जवान सुरेश पवार रात्रपाळीहून दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चालकाला बस थांबवायला सांगितली. तसेच नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली.

अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पाेहोचेपर्यंत पवार यांनी तत्परता दाखविली. प्रसंगावधान राखून चालक, वाहक आणि जवानाने मिळून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. पीएमपी प्रवाशांनी जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले.