ब्रेकिंग न्यूज

आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण भूगोल फाउंडेशन चा उपक्रम

पिंपरी पुणे -मोशी संतनगर येथील पर्यावरण पुरक कार्य करणाऱ्या भूगोल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेगाव तालुक्यात देशी तसेच आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सातगाव पठार भागातील पेठगावाजवळ सौरंग्या डोंगराच्या परिसरात तसेच कारेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात विविध देशी व आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण करून आपली वसुंधरा अधिक हिरवीगार व पर्यावरण वाढीस सहभाग या…

Read More

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार – समीर भुजबळ

पिंपरी, पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसह आरक्षण, शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसींसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल. हे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर ओबीसी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात…

Read More

शहरात होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्‍या अनेक वर्षांपासून वकील आणि नागरिकांच्‍या मागणीला अखेर यश आले असून शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना व पदांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरात आता या दोन वरिष्ठ न्‍यायालयांची स्‍थापना होणार असून पिंपरी-चिंचवडकरांना पुण्याला माराव्‍या लागणाऱ्या चकरा कमी होणार आहेत. शहरात ही न्‍यायालये…

Read More

ब्रिटिश पार्लमेंट, लंडन मध्ये डॉ. दीपक हरके यांचा एक्सलेंस अवॅार्ड देऊन सन्मान

  पिंपरी, पुणे – लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांचा “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मान करण्यात आला. हाऊस ऑफ कॅामन्स, ब्रिटिश पार्लमेंट लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट च्या सीईओ डॅा. परिन सोमाणी, खासदार बॉब ब्लॅकमन व गाम्बिया चे राजकुमार महामहिम इब्राहिम सान्यांग…

Read More

पुनर्विकासाची नांदी — यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

पिंपरी- प्रतिनिधी :– राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या संयोजनाखाली तसेच भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यावरील मार्गदर्शनासह ९४१ घरांच्या पुनर्विकासाची टेंडर…

Read More

महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देताना महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास अद्यापदेखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील सर्व विभागातील एकूण ४ हजार ७८४…

Read More

वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या मोफत विम्यामुळे ग्राहकाला मिळाले तब्बल साडेचार लाख रुपये!

चाकण: येथील सुप्रसिद्ध सुवर्णपेढी वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांना दागिन्यांसोबत दिलेला मोफत विमा, कठीण प्रसंगी किती महत्त्वाचा ठरतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका चोरीच्या घटनेत, या मोफत विम्यामुळे ग्राहकाला चोरीला गेलेल्या दागिन्यांची सुमारे साडेचार लाख रुपयांची भरपाई अवघ्या दहा दिवसांत मिळाली आहे. या घटनेबाबत माहिती देताना, वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक नकुल…

Read More

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी -‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे,…

Read More

महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण थांबवा!

  पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ या खासगी संस्थेकडे पुढील पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमासाठी महापालिकेच्या निधीतून ₹४० कोटी ५३ लाख ७५ हजार इतका मोठा खर्च होणार आहे.ही बाब केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर आहे, कारण यामुळे सार्वजनिक शिक्षणाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढते…

Read More

पवना नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरणाची मंजुरी;माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी : शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) कडून अधिकृत पर्यावरण मंजुरी (Environment Clearance) व ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. हा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला. सादर करण्यात आलेल्या सविस्तर अहवालात प्रकल्पाच्या प्रत्येक पैलूची शास्त्रीय व तांत्रिक पातळीवर बारकाईने तपासणी करण्यात आली आणि…

Read More