ब्रेकिंग न्यूज

मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे संपन्न

Share

पिंपरी-आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. आणि रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडली.

यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माथाडी कामगारांच्या आर्थिक स्थेऱ्याला बळकटी मिळवून देणाऱ्या दोन्ही पतसंस्थांची कार्यक्षमता व विश्वासहर्ता अधोरेखित झाली शिवसेनेचे धोरण कायम कामगार वर्गाच्या हिताचे राहील.दोन्ही पतसंस्थांनी कामगारांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला आहे.सभासदसंख्या वाढ, ठेवी, स्वनिधी, गुंतवणूक आणि पारदर्शक कारभार हीच यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. शिवसेनेचे धोरण कायम कामगारवर्गाच्या हिताचे राहील याची खात्री देतो.

रायरेश्वर पतसंस्थेचा ३२ वा अहवाल अध्यक्ष श्री. सतिश कंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1270 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने खालील आर्थिक प्रगती साधली आहे:

वसूल भाग भांडवल: ₹7 कोटी 45 लाख

ठेवी: ₹2 कोटी 5 लाख

कर्जवाटप: ₹12 कोटी 35 लाख

स्वनिधी निधी: ₹2 कोटी 37 लाख

बँकेत गुंतवणूक: ₹3 कोटी 24 लाख

निव्वळ नफा: ₹1 कोटी 5 लाख

संचालक मंडळ (रायरेश्वर): श्री. श्रीकांत मोरे (उपाध्यक्ष), श्री. ज्ञानेश्वर घनवट (सचिव), श्री. रोहित नवले (खजिनदार), तसेच संचालक श्री. भिवाजी वाटेकर, श्री. शंकर निकम, श्री. विजय खंडागळे, श्री. सुभाष पुजारी, श्री. बाळू ओव्हाळ, श्री. संदीप चोरे, श्री. गुलाब शिंदे आदींनी उपस्थिति लावली तर

मातोश्री पतसंस्थेचा 28 वा अहवाल अध्यक्ष श्री. पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1444 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने खालील आर्थिक प्रगती साधली आहे:

वसूल भाग भांडवल: ₹9 कोटी 70 लाख

ठेवी: ₹2 कोटी 34 लाख

कर्जवाटप: ₹17 कोटी 96 लाख

स्वनिधी निधी: ₹3 कोटी 53 लाख

बँकेत गुंतवणूक: ₹2 कोटी 98 लाख

निव्वळ नफा: ₹1 कोटी 32 लाख

संचालक मंडळ (मातोश्री ): श्री. पांडुरंग कदम (अध्यक्ष) श्री बबन काळे (उपाध्यक्ष), श्री. उध्दव सरोदे (सचिव), श्री. सर्जेराव कचरे (खजिनदार), तसेच संचालक श्री. गोरक्ष दुबाले, श्री बाबासाहेब पोते, श्री.अशोक साळुंके , श्री. विठ्ठल इंगळे , श्री. समर्थ नाईकवडे, श्री. ज्ञानदेव पाचपुते , श्री. चंद्रकांत पिंगट, आदीं
उपस्थित होते .

सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. इरफानभाई सय्यद होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप देशमुख (अध्यक्ष: असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे) तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी, सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: श्री. सर्जेराव कचरे व अहवाल वाचन: श्री. प्रकाश पवार व श्री. धर्मराज कदम यांनी केले.