पिंपरी – मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सन २०२५ चे दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव , राज्याचे पदाधिकारी प्राचार्य रामकिसन पवार ऍड लक्ष्मण रानवडे ,संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड , जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर, सुनीता शिंदे, सुलभ यादव , अश्विनी पाटील, रेखा गुळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. मराठा सेवा संघाची दिनदर्शिका अंधश्रद्धा मुक्त असून यामध्ये इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनांची नोंद आहे. ही दिनदर्शिका मराठा सेवा संघाचे संस्थपाक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कार्याला समर्पित केली आहे.
मराठा सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या नियुक्त्या जाहीर केल्या . शहर सचिव डॉ. शिवाजीराव ढगे, सहसचिव सुनील जाधव , दिलीप गावडे, कोषाध्यक्ष संपतराव जगताप, उपाध्यक्ष प्रकाश बाबर, मंचक जाधव, वाल्मिक माने, विजय शिंदे, संघटक
अरुण घोलप, संदीप नवसुपे ,सत्यशिल जाधव या पधाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राज्याचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रामकिसन पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती देऊन सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले. डॉ. शिवाजीराव ढगे ,सुनील जाधव यांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमात बीड जिल्यातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . ऍड लक्ष्मण रानवडे, शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे ,संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभ यादव ,यांनी मनोगत व्यक्त केले . जिजाऊ वंदना रत्नप्रभा सातपुते यांनी सादर केली. सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले.
