मोशी (वेध न्यूज ) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी ,संस्था तसेच इंद्रायणीनगर , संतनगर परिसरातील नागरीक यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
मोशी प्राधिकरणातील एम आय डी सी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत हजारो दिवे लावून साजरा करण्यात आला.
या दीपोत्सवाला महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनम गोडबोले यांची प्रमुख उपस्तिथी होती. . भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळाचे चे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी सर्वांचे स्वागत केले. पर्यावरण , वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन,वसुंधरा वाचवा या विषयी करत असलेल्या कामाची माहिती सांगितली . एक दिप पर्यावरणासाठी हा मंत्र घेऊन पर्यावरणासाठी काम करणार,वृक्षरोपण संवर्धन करणार,प्लॅस्टिकचा वापर करणार नाही आणि वसुंधरेला हानी होईल असे कृत्य करणार नाही, करु देणार नाही.असे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करून पर्यावरणासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी स्वतः सहभागी होऊन योग्य ती मदत केली जाईल असे सांगितले.तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनम गोडबोले यांनी स्रिया व मुलींना सशक्त करण्यासाठी संस्थेने कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्याची सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांचा आपट्याचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

संत साई स्कुलचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर सर, इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर,कामगार नेते हनुमंत लांडगे, जेजुरी खंडेराय देवस्थान विश्वस्त तुषारभाऊ सहाणे,युवानेते निलेश मुटके,मा. सभापती विजय लोखंडे,पोलीस हवालदार संतोष फावडे यांनीही उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी संतनगर, इंद्रायणीनगर परीसरातील मंडळाचे उपाध्यक्ष उद्योजक मारुती गायकवाड, उद्योजक नवनाथ कोलतेपाटील, अनिल जगताप,राजेश किबिले, भास्कर दातीर,जयसिंग कोहीनकर , चंद्रकांत थोरात, शशिकांत वाडते,भारत सरडे,अनिल घाडगे,एकनाथ फटांगडे,मनोज माकोडे,संजय मरगळे, संतोष पाटील, नागेश शेळके,विलास मोरे,संकेत थोरात,मच्छिंद्र बुर्डे,धर्मा पाटील,अनिल रासकर, अजिंक्य पोटे, अशोक पोटे, संजय रसाळ,पर्यावरण मित्र अण्णा मटाले,बबुशेठ मुटके, सचिन जाधव,सुहास चव्हाण,संजय गाढवे,रामदास चपटे सर, राम देशमुख सर,अंबादास कुमावत, रमेश जाधव,गणेश निकम, अशोक मडावी,अशोक यादव,यश इचके ,पोलीस हवालदार के आर वाव्हळ,पोलीस शिपाई तानाजी सोनवणे,अमोल राजगुडे उपस्थित होते.
भूगोल फाउंडेशनच्या महिला आघाडीच्या शोभा फटांगडे ,ज्योती दरंदले , गवळीनगर पतसंस्थेच्या संचालिका आशा वाळुंज, रोहिणी वाळुंज,मिना नायडु,संगिता इचके,शिला इचके, स्नेहा गायकवाड, संगिता मिसाळ,मिना आखाडे,अनघा मडावी,श्रावणी किबिले,सेजल वाळुंज, ऎश्वर्या इचके,अपुर्वा वाळुंज ,वैष्णवी इचके,सुनिता जाधव,शितल थोरात,प्रज्ञा राजगुडे पोलीस शिपाई अर्चना वेखंडे यांच्यासह लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

