ब्रेकिंग न्यूज

पवना धरण ९३ टक्के भरले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Share

मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पवना धरण गुरुवारी (दि.२३) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९३.१० टक्के भरले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.

धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी नदीपात्रामधील आपले साहित्य, शेती अवजारे कृषी पंप, जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित अंतरावर ठेवावेत अशी सूचना करण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी आवश्यक माहिती जलसंपदा विभागाच्या अँर्फत देण्यात येईल.

कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाने वेळोवेळी दलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवनानगर पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणांमधील गुरुवारी संध्याकाळचा पाणीसाठा

पवना ९३.१०
आंद्रा ९०.१२
भामा आसखेड ८५.१०
मुळशी ८४.०९