दिवाळीत मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये घरातील ६ जणांचा होरपळून मृत्यू, धाराशिव जिल्ह्याती दुर्दैवी घटना

दिवाळीत मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये घरातील ६ जणांचा होरपळून मृत्यू, धाराशिव जिल्ह्याती दुर्दैवी घटना
Share

धाराशिव- लक्ष्मीपूजननिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना धारशिवमध्ये घराला आग लागून ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना धाराशिव जिल्ह्यात येडशी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये गोविंद करंडे यांच्या घराला मध्यरात्री आग लागली. गोविंद करंडे यांचे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान आहे. तर, त्यांचे कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. मध्यरात्री घराला आग लागल्याने घरात असलेल्या सहा जणांचा यामध्ये गुदमरून मृत्यू झाला.

आग लागली त्यावेळी १२ जण घरात होते. उर्वरित ६ जणांची सुटका झाली. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीतून या कुटुंबाला वाचवण्यात अपयश आले.

प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणतीमुळेच आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Vedh News