पिंपरी- पिंपरीगावातील शिवछत्रपती मित्र मंडळाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान, नेत्र तपासणी शिबिराचा १४५ नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराला पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. यंदा मंडळाच्या वतीने दररोज महिलांचे अथर्वशीर्ष पठण, भजन, कीर्तन, न्यू होम मिनिस्टर (खेळ रंगला पैठणीचा ) असे विविध सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मंडळाच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि शिवजयंती हे उपक्रम राबविण्यात येतात.
मंडळाची स्थापना १९७६ साली झाली असून यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष दशरत वाघेरे, खजिनदार सुरेश वाळुंजकर, पदाधिकारी नारायण वाळुंजकर, विजय खराडे, रमेश खराडे, नंदू बलकवडे विशेष परिश्रम घेत आहेत.

