वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून युवा नेते राजेंद्र तरस यांनी दिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५ लाख ५५ हजारांचा निधी!

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून युवा नेते राजेंद्र तरस यांनी दिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५ लाख ५५ हजारांचा निधी!
Share

पिंपरी – वाढदिवस म्हटले की जल्लोष, सत्कार आणि विविध कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, या परंपरेला फाटा देत युवा नेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 

नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीपेक्षा समाजाप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे. आपल्या आनंदात गरजूंचाही वाटा असावा, या भावनेतून हा निधी देण्यात आल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले.

‘वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हाच खरा वाढदिवस,’ या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Vedh News