पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करतात, राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करतात, राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)
Share

नवी दिल्ली- काँग्रेस खासदार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. आपला फोन टॅप केला जात असल्याचा सनसनाटी दावा त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी आरोप करताना म्हटले की, मी केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. या फोनला पंतप्रधान मोदी टॅप करत आहेत. समोरासमोर चर्चा केल्यानंतर स्पष्ट होईल की, परकीय देशांच्या इशाऱ्यांवर कोण काम करत आहे. तसेच कोण किती देशद्रोही आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे, हे समजेल. मला ज्ञात असलेली बरीच माहिती माझ्या फोनमध्ये आहे’.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेच आव्हान दिले. समोरासमोर चर्चा केली, तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत’, असा टोला राहुल गांधींनी लगावला. भाजप संसदेत वादविवाद करण्यास तयार असताना तुम्ही जाहीर वादविवाद करण्याचा आग्रह का धरताय, असा प्रश्न राहुल गांधींना इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशन दरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर लोकसभेत मला बोलू दिले जात नाही. माझा माईक बंद केला जातो, असे उत्तर राहुल गांधींनी दिले.

 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कृषी कायदे, मत चोरी, एसआयआर , चीन, जनरल नरवणे यांचं पुस्तक, एपस्टिन फाइल या प्रकरणावर बोलू दिले जात नाही. आम्हाल लांबलचक भाषणे नकोत. आम्हाला थेट उत्तरे हवीत. ज्यात दोन्ही नेत्यांची समोरासमोर चर्चा होईल’. पंतप्रधान मोदी एका बाजूला बसावेत. मी दुसऱ्या बाजूला बसेन. दोघांमध्ये थेट प्रश्न-उत्तरे व्हावीत. या वादविवादावेळी गौतम अदानी किंवा सरसंघचालक मोहन भागवत परीक्षक असले तरी मला त्यांना आक्षेप नसेल, अशा शब्दांत राहुल गांधी पंतप्रधानांना ‘ओपन डिबेट’चं आव्हान दिले. माझ्या सोबतच्या वादविवादानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, अशी खात्री देतो, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Vedh News