‘दुबई जपानला जायचं आहे..’ भाच्याच्या आवाजात फोन आणि बँक खाते साफ, तब्बल ७ लाख ९९ हजार लंपास

‘दुबई जपानला जायचं आहे..’ भाच्याच्या आवाजात फोन आणि बँक खाते साफ, तब्बल ७ लाख ९९ हजार लंपास
Share

पुणे- भाच्याच्या आवाजात फोन करून दुबई आणि जपानला जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून सायबर चोरटयांनी एका ५८ वर्षाच्या इसमाची ७ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून चोरटयांनी ही रक्कम लंपास केली.

या प्रकरणी पुकाराम चेककराम गोदा (वय ५८, रा. क्लासिक सोसायटी, हांडेवाडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि बँक खातेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ ते १९ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या भाच्याच्या आवाजात बोलून संपर्क साधला. जपान आणि दुबईला जायचे आहे, पैशांची गरज आहे असे सांगितले. भाचा असल्याने फिर्यादीचा विश्वास बसला आणि आरोपींची सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठवले. अशा प्रकारे ७ लाख ९९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. फुरसुंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Vedh News