पुण्यात बँकेबाहेर संशयास्पद बॅग आढळली, बॉम्ब स्कॉड घटनास्थळी, काय आढळले बॅगेत ?

पुण्यात बँकेबाहेर संशयास्पद बॅग आढळली, बॉम्ब स्कॉड घटनास्थळी, काय आढळले बॅगेत ?
Share

पुणे- पुण्यातील कॅम्प परिसरात १५ ऑगस्ट चौकाजवळ एका बँकेबाहेर बेवारस आणि संशयास्पद बॅग आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बॅगेत बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प भागातील १५ ऑगस्ट चौकाजवळ असलेल्या एका बँकेबाहेर संशयास्पद बॅग पडून असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक नाशक पथकाला माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून भीतीच्या वातावरणामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण परिसर काही काळासाठी रिकामा केला होता.

मात्र, बॉम्बशोधक व नाशक पथकाने (BDDS) बॅगेची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने बॅगेची तपासणी केली. या तपासणीत बॅगेत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नसल्याचे स्पष्ट झाले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Vedh News