माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे १०० व्या वर्षात पदार्पण

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे १०० व्या वर्षात पदार्पण
Share

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी रविवारी ८ नोव्हेंबर रोजी आपल्या वयाची ९९ वर्षे पूर्ण करून आयुष्याच्या १०० व्या वर्षात पदार्पण केले. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर करत लालकृष्ण अडवाणी यांच्या देशसेवेतील अतुलनीय योगदानाची आठवण करून दिली. तसेच अडवाणी यांच्या जीवनप्रवासावर लिहिलेला एक विशेष लेखही त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

या विशेष प्रसंगी देशातील प्रमुख नेत्यांनी आणि मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडवाणी यांना ‘राष्ट्रसेवेचे प्रतीक, भाजपचे शिल्पकार आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी’ असे संबोधून शुभेच्छा दिल्या.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांच्या सार्वजनिक जीवनातील सचोटी, समर्पण आणि नेतृत्वाचे कौतुक केले. तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

नितीन नबीन आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि पक्षाच्या विस्तारात त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

यानिमित्ताने नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात विशेष पूजा-हवन आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि आडवाणी यांची कन्या प्रतिभा आडवाणी उपस्थित होत्या. तसेच त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक विशेष २० मिनिटांची लघुपट (प्रदर्शित व्हिडिओ) दाखवण्यात आला.

Vedh News