पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील वातावरण पेटलेले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे तरविद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार आज, शुक्रवारी नवी मुंबई येथे घडला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार शुक्रवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सहकाऱ्यांसह हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करत हरपाळकरांना काळे फासले.
संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सहकाऱ्यांसह हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करत हरपाळकरांना काळे फासले. महेंद्र हरपाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आण्णासाहेब सावंत यांनी केली. तसेच त्यांनी राजीनामा दिला नाही, तर MPSC अध्यक्षांच्या दालनात घुसून त्यांच्या तोंडालाही काळे फासले जाईल, असा इशारा सावंत यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
MPSC चा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्यावतीने संभाजी ब्रिगेडने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि नालायक सरकारच्या तोंडाला काळे फासले आहे. महेंद्र हरपाळकरच्या जी थोबाडीत मारली आहे ती या सरकारला जनतेच्यावतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली.
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की शाईफेक करणे दुर्दैवी आहे. आमचे कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावरही शाईफेक केली होती, त्याचाही आम्ही निषेध केला होता. लोकशाहीमध्ये आंदोलन करुया, चर्चा करुया आणि त्यातून मार्ग काढला जाऊ शकतो, पण शाईफेक करणे योग्य नाही. आम्ही पक्षाचं राजकारण करतोय असं नाही तर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. काळं फासणे वगैरे हे मला स्वत:ला सुसंस्कृत वाटत नाही.
तीन दिवसांपूर्वीच पुण्यात MPSC विद्यार्थ्यांनी ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला होता. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार सहभागी झाले होते. काही राजकीय नेत्यांनीही या आंदोलनाला उपस्थिती लावली होती.
कोण आहेत महेंद्र हरपाळकर?
महेंद्र हरपाळकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव असून डिसेंबर २०२५ पासून या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर काम केलेले आहे. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भातील तक्रार आल्यानंतर महेंद्र हरपाळकर यांनी एका तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याची माहिती दिली होती. हरपाळकर १९९५ पासून प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
