ब्रेकिंग न्यूज

कळसूबाई शिखरावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची सुटका

अकोले- कळसुबाई, हरिश्चंद्र गडावर ट्रेकसाठी गेले असताना रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या मुंबईच्या आठ पर्यटकांची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील चार पर्यटक कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. सोबत कुणीही वाटाड्या किंवा माहितगार माणूस न घेता हे कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाले. वाटेत हिरवागार निसर्ग, अधून मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत…

Read More

ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन, वयाच्या १०१ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे- व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आज (दि. २४) निधन झालं. वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यातील वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषेचा गाढा अभ्यासक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे मूळ…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सुरेश कंक, मानसी चिटणीस,उत्तम दंडिमे सन्मानित

पुणे : मातंग साहित्य परिषद पुणे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी शिंदे आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची परिषद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विविध सामाजिक,साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत…

Read More

मुलीच्या आवाजात कॉल करून ‘क्रिप्टोकरन्सी’द्वारे तरुणाला दीड लाखाला गंडा, तरुणाला अटक

पुणे- प्रिन्सिका जोशी नावाने मुलीच्या आवाजात कॉल करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल दीड लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार तब्बल सात महिने सुरु होता. कुणाल जितेंद्र अदमाने (वय-२५, रा. पर्वती परिसर) असे या…

Read More

पिंपरी पोलिस चौकी मध्ये तक्रार घेण्यास पुन्हा सुरुवात करा, पिंपरी मर्चंट फेडरेशन ची मागणी

पिंपरी- पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या…

Read More

ज्येष्ठ नागरिकाने केली गंमत आणि मुंबई विमानतळावर निर्माण झाले तणावाचे वातावरण, काय घडले नेमके ?

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर बॅगेत स्फोटक असल्याचे सांगितल्याने विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित प्रवाशाला अटक करून तपासणी केली असता त्याने केलेला दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले. अनुज जयराम सुवर्णा (वय ५५) असे या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना सकाळच्या…

Read More

स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पिंपरी- : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळाली, तर स्थानिक खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याचे तसेच पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेत विविध…

Read More

समाजाचे ऋण फेडण्यासाठी अर्थपूर्ण योगदान द्या – कर्नल ऋषिकेश धोत्रे

पिंपरी- मातृभूमी, कुटुंब आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने आपले अर्थपूर्ण योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवा हे ध्येय ठेवून शिस्त पालन करून समृद्ध जीवन घडवावे असे मार्गदर्शन कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीसीयू संचालक…

Read More

औंध-बोपोडीत रंगले बाल-कलाकारांचे विश्व; स्वच्छतेचा संदेश देत सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

बोपोडी (पुणे) : नगरसेवक सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी परिसरात ‘औंध-बोपोडी प्रभाग – स्वच्छ पुणे’ या थीमनुसार भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात आली असून, तब्बल ५८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर रंगमय करून टाकला. लहानग्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण, महापुरुषांचे…

Read More

शैक्षणिक क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला शिवसृष्टी येथील शिवरायांच्या पराक्रमाचा थरारक अनुभव!

पिंपरी -छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, चिंचवड या शाळेतील प्राथमिक विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच कात्रज येथील शिवसृष्टी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. शिवसृष्टीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या यथासांग कार्याची अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिके आणि गड किल्ल्यांची माहिती मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता….

Read More