‘गोकुळ’चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील व संचालक मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट

‘गोकुळ’चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील व संचालक मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट
Share

मुंबई- राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व संचालकांशी संवाद साधला. गोकुळ दूध संघाचा कारभार करताना दूध उत्पादक शेतकरी सभासदांचे हित नेहमी केंद्रस्थानी ठेवावे. संघाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक आणि काटेकोरपणे चालवून शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासोबतच सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण संस्थेची विश्वासार्हता आणि प्रगती कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

Vedh News