अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अनावरण

अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अनावरण
Share

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आज, सोमवारी दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

या सोहळ्यात अजितदादांच्या कार्यावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’ आणि त्यांच्या जीवनकार्यावरील लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. “आजचा क्षण माझ्यासाठी भावुक आहे. ज्या झेडपीवर अजितदादांनी प्रेम केले तेथच त्यांचा पुतळा उभारला. लोकांच्या मनात अजित दादांच स्थान मोठं होतं. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापासून खासदार आणि सात वेळा आमदार होण्यापर्यंतचा दादांचा प्रवास मोठा होता. मात्र, त्यांच्यातील ग्रामीण माणूस कधीही बदलला नाही”

अजित पवारांचा रागही लोकांना आपलासा वाटायचा. दादांचा चेहरा शेतकऱ्यांना आपला वाटायचा. त्यांचा रांगडेपणा आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तळमळ सर्वांनी पाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दादांना नेहमीच आधार होता. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. दादा, तुमच्या जाण्याने विकासाची जी कामे अपूर्ण राहिली आहेत, ती आम्ही पूर्ण करू,” असा विश्वासही यावेळी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Vedh News