टायटॅनिक प्रदर्शनास पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टायटॅनिक प्रदर्शनास पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Share

पिंपरी- टायटॅनिक या इतिहास प्रसिद्ध जहाजाच्या संदर्भात माहिती देणारे व मनोरंजन करणाऱ्या प्रदर्शनास पिंपरी चिंचवडकरानी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

रावेत मुकाई चौकात हे प्रदर्शन सुरु असून महिनाभर चालू असलेल्या या प्रदर्शनातून आबाल वृद्धानी टायटॅनिक बद्दलचा इतिहास जाणून घेतला. त्याचबरोबर येथे उभारलेल्या सेटवर तसेच टायटॅनिक मधील उभे केलेल्या मनोऱ्या सोबत नागरिकांनी आपली सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. एका आगळ्यावेगळ्या विषयावर सादर करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत अशाच प्रकारची प्रदर्शने आयोजित केली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

टायटॅनिक हे जहाज कोणत्या कंपनीने बनवले कोणत्या वर्षी ते बनवण्यास घेतले केव्हा हे जहाज बनवून पूर्ण झाले त्याची पहिली सफर केव्हा झाली? हे जहाज कशाप्रकारे होते या कंपनीचे मालक कोण होते तसेच जहाजाचे कॅप्टन कोण होते याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना देण्यात येत आहे.

या अभूतपूर्व ज्ञानरंजनाबरोबरच या प्रदर्शनात हॅण्डलूम, हँडीक्राफ्ट, विविध प्रकारची खेळणी, पुस्तके, फूड स्टॉल अशा विविध प्रकारचे 35 स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.

हे प्रदर्शन आता २२ नोव्हेंबर पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. केवळ दहा-पंधरा दिवसच हे प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरात असल्याने अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदर्शनाचे संचालक सुदेश कुमार यांनी केले आहे.

Vedh News