कारवर अशोकस्तंभ आणि ‘सरपंच’ लोगो लावल्याप्रकरणी चालकासह मालकावर गुन्हा दाखल

कारवर अशोकस्तंभ आणि ‘सरपंच’ लोगो लावल्याप्रकरणी चालकासह मालकावर गुन्हा दाखल
Share

पिंपरी- अधिकृत परवानगीशिवाय कारवर अशोकस्तंभ आणि ‘सरपंच’ असा उल्लेख असलेला लोगो लावल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी कारचालक आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रावेत येथील भोंडवे कॉर्नर परिसरात वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास काळ्या रंगाची कार आली. या कारवर अशोकस्तंभाचे चिन्ह आणि ‘सरपंच’ असा उल्लेख असलेला लोगो लावण्यात आला होता.

वाहतूक पोलिसांनी कार थांबवून चौकशी केली. त्यावेळी संबंधित चिन्हे आणि लोगो वापरण्यासाठी चालक व वाहनमालकाकडे अधिकृत परवानगी नसल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. यानंतर रावेत पोलिसांनी चालक आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

Vedh News