पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात! कार डिव्हायडर ओलांडून थांबलेल्या ट्रकला धडकून ३ तरुणांचा मृत्यू

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात! कार डिव्हायडर ओलांडून थांबलेल्या ट्रकला धडकून ३ तरुणांचा मृत्यू
Share

पुणे – पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला तर दोन जण गंभीर जखमी झाले. रविवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास वाघोली परिसरातील कटकेवाडी जवळ हा अपघात घडला. 

या भीषण अपघातात ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि मयूर सतीश औटी (वय अंदाजे २६) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघेही वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील रहिवासी आहेत.

या भीषण अपघातात ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि मयूर सतीश औटी (वय २६/२७, वयाबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तिघेही वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील रहिवासी आहेत. या अपघातात आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर आय मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भरधाव फोक्सवॅगन पोलो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून पलटी झाली. त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये सुमारे ६० ते ७० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली.

अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मध्यरात्रीच्या या भीषण अपघातामुळे वाघोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून तीन तरुणांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Vedh News