ब्रेकिंग न्यूज

ट्रक-दुचाकीच्या अपघातात शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर ; सुपे-चौफुला मार्गावरील घटना

Share

बारामती- मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे- चौफुला मार्गावर अहिल्याबाई चौकात आज (दि. २६) दुपारी घडली.

सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सख्खा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.