तरुणीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या पर्वतीतील दोघा नराधमांना अटक

तरुणीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या पर्वतीतील दोघा नराधमांना अटक
Share

पुणे- वडगाव शेरी येथील मैत्रिणीला फुस लावून कोंढवा येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धककादायक घटना समोर आली आहे. येरवडा पोलिसांनी दोघा नराधमांना अटक केली आहे.

गणेश शंकर पाठक ( वय २८, रा. मातृकृपा इमारत, पर्वती) आणि श्रेनिक प्रमोद चव्हाण (३६, रा. पर्वती चरण सोसायटी, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. ते एकाच ठिकाणी काम करत होते. त्यांनी या तरुणीला तीन दिवसापूर्वी फुस लावून कोंढव्यातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर दोघांनी एकापाठोपाठ एक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला हे कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. या घटनेनंतर तिने मंगळवारी येरवडा पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तातडीने कारवाई करत या दोघा नराधमांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते तपास करीत आहेत.

Vedh News