वंचित,पारधी आणि भटक्या -विमुक्त विद्यार्थ्यांबरोबर गुणवंत कामगार कल्याण मंडळाची दिवाळी साजरी

वंचित,पारधी आणि भटक्या -विमुक्त विद्यार्थ्यांबरोबर गुणवंत कामगार कल्याण मंडळाची दिवाळी साजरी
Share

पिंपरी- गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेतील विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त फराळ, सुवासिक तेल, उटणे व टॉवेल वाटप करण्यात आले.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. ह्या प्रमुख उद्देशाने प्रेरित होऊन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे. आपण इकडे तिकडे न जाता आपल्या शहरात असलेल्या संस्थेला मदत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संस्थेच्या कार्याची माहिती देताना देशपांडे सरांनी सांगितले “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड” ही संस्था शतकानोशतके उपेक्षित राहिलेल्या वंचित, पारधी आणि भटक्या-विमुक्त समुदायातील मुलांच्या उन्नतीसाठी व उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करते. संस्थेची स्थापना २००९ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केली. उपेक्षित घटकातील मुला-मुलींना इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे मोफत दिले जाते.तसेच त्यांच्या निवासाची मोफत सोय केली आहे.पारंपरिक कला व कौशल्य विकास पुस्तकी ज्ञानासोबतच या मुलांमधील अंगभूत पारंपरिक कला, हस्तकला आणि कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणवीले जाते.आपण केलेली ही मदत फार महत्त्वाची आहे.तसेच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आला होता.संस्था नदीतीरी असल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गोमातांना चारा दान केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महमंद शरीफ मुलाणी यांनी केले.डॉ.भारतीताई चव्हाण यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके, किरण देशमुख, श्रीकांत कदम, संदीप पोलकम, संदीप रांगोळे, काळुराम लांडगे, सतीश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी एकोंडे, राजेश हजारे, संजय गोळे, भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शिवराज शिंदे, शिवाजी पाटील सहकार्य केले.

Vedh News