दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन व पेन्शन तातडीने जमा करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा सक्त आदेश

दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन व पेन्शन तातडीने जमा करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा सक्त आदेश
Share

मुंबई – दिवाळीच्या आधी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन तसेच अंशकालीन निर्देशकांचे मानधन वेळेवर मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सक्त आदेश जारी केला आहे.

संचालक शरद गोसावी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष पत्र पाठवून दिवाळीपूर्वी सर्व देयके अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. सणाच्या तोंडावर वेतन किंवा मानधन प्रलंबित राहिल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि प्रशासनही अडचणीत सापडू शकते, अशी बाब या आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी वेतनाची देयके अदा न झाल्यास कर्मचारी संघटनेकडून निषेध किंवा निवेदन दिले जाऊ शकते. तसेच विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित होऊन नाहक अडचण निर्माण होऊ शकते. असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

Vedh News