चिंचवडच्या मोहननगर परिसरात तीन पत्त्यांचा जुगार ; पाच जणांना अटक

चिंचवडच्या मोहननगर परिसरात तीन पत्त्यांचा जुगार ; पाच जणांना अटक
Share

पिंपरी‌ – चिंचवड येथील संघवी कॉलेज चौक, मोहननगर परिसरात मोकळ्या जागेत विनापरवाना तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १ हजार ११० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हनुमंत माणिक कांबळे (वय २६), प्रवीण बाबुराव कसबे (वय ३६), देवीदास आदिक मोरे (वय ४५), शिवाजी गंगाराम पाळेकर (वय ६३) आणि महेश जालिंदर कांडेकर (वय ३६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास संघवी कॉलेज चौक, मोहननगर, चिंचवड येथील मोकळ्या जागेत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या पैशांवर तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र बारसिंगे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Vedh News