पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसाला बेदम मारहाण, वाय सी एम रुग्णालयातील प्रकार

पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसाला बेदम मारहाण, वाय सी एम रुग्णालयातील प्रकार
Share

पिंपरी- एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पोलिसाला डोकं फुटेपर्यंत मारहाण केली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा प्रकार घडला असून या प्रकरणी हल्लोखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अमोल शिंदे असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते ठाणे अंमलदार पदावर कार्यरत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या YCM रुग्णालयात काही कारणास्तव तणाव निर्माण झाला होता. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, तिथे उपस्थित असलेल्या अमोल शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करत तो हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, राग अनावर झालेल्या राजकीय व्यक्तीच्या काही कार्यकर्त्यांनी थेट शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केली.

या मारहाणीत शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला ३ टाके घालावे लागले. खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यावरच अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात आणि वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Vedh News