एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेले दांपत्य झाले बेपत्ता, दोन दिवसानंतर आढळली स्कुटी आणि…

एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेले दांपत्य झाले बेपत्ता, दोन दिवसानंतर आढळली स्कुटी आणि…
Share

कर्जत – एकविरा देवीचे दर्शन घेऊन स्कुटीवरून घरी परत येत असताना एक दांपत्य अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवस त्यांचा शोध घेतला असता त्यांची अपघातग्रस्त स्कुटी एका झुडपीत आढळून आली. तर या दोघांचे मृतदेह देखील आढळून आले. त्यामुळे स्कुटीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रशांत रवींद्र तांडेल आणि त्यांची पत्नी चैत्राली तांडेल अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी हे दाम्पत्य त्यांच्या स्कूटरवरून एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना जुन्या महामार्गावरील कर्जत आणि खोपोली दरम्यान चालकाचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले. त्यांची स्कूटर महामार्गावरून थेट बाजूला असलेल्या खोल दरीत किंवा झुडपात कोसळली.

अपघात इतका भीषण होता आणि गाडी थेट रस्त्याखालील झुडपात गेल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कोणाच्याही ते लक्षात आले नाही. इकडे दाम्पत्य घरी न परतल्याने आणि त्यांचे फोन बंद असल्याने नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशन यांनी सायमाळ जवळ शोध घेतला असता मोबाईल लोकेशनमुळे त्यांचा शोध लागला. त्यांचे मोबाईल लोकेशन खोपोली सायमाळ ते शिंग्रोबा मंदिर दाखवत असल्याने खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशन यांनी शोध मोहीम सुरू केली. २२ ऑक्टोबर रोजी प्रशांत तांडेल यांची स्कुटर टाटा सायमाळ स्टाफ कॉलनीच्या सुरक्षा भिंतीवर गाडी अडकली होती. गाडीखाली प्रशांत तांडेल यांचा मृतदेह आढळला तर सुरक्षा भिंतीखाली चैत्राली तांडेल यांचा मृतदेह पडलेला होता. दोघांच्याही डोक्याला जबर मार लागलेला होता.

खोपोली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. खोपोली पोलिसांना तपासादरम्यान अपघातग्रस्त स्कुटी एका झाडी-झुडपात अडकलेली आढळली. त्यानंतर आजूबाजूला शोध घेतला असता, प्रशांत आणि चैत्राली या दोघांचेही मृतदेह तेथे आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे तांडेल कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Vedh News