बारामती- तडीपार गुंडाने धावत्या कारच्या टपावर आणि बॉनेटवर बसून दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती येथे समोर आली असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
अक्षय उर्फ सोन्या कांबळे असे या तडीपार गुंडांचे नाव आहे. त्याला १८ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा आदेश लागू असतानाही त्याने बेकायदेशीरपणे बारामती शहरात प्रवेश केला. एवढेच नव्हे, तर त्याने एका चालत्या कारच्या टपावर आणि बॉनेटवर बसून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
या व्हिडिओची दखल घेऊन बारामती पोलिसांनी सोन्या कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
