ब्रेकिंग न्यूज

पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

Share

पुणे – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना पुण्याच्या कात्रज भागात घडली. या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची हैदराबादची रहिवासी होती. ती पुण्यातील नामांकित भारती विद्यापीठात एमबीबीएस शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणाच्या निमित्ताने ती कात्रज भागातील एका निवासी संकुलात वास्तव्यास होती.

दुपारी एकच्या सुमारास तरुणीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. खाली पडल्यानंतर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणीने टोकाचे पाऊल नेमके कशामुळे उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत.