पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्र. ८ इंद्रायणीनगर परिसरातील क्रीडा संकुले, बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा मैदानावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणांमुळे स्थानिक मुले आणि क्रीडा प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी नगरसेवक तुषार सहाणे यांनी केली आहे.
इंद्रायणी, मोशी प्राधिकरण भागातील खेळाची मैदाने आणि क्रीडा संकुले ही मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि सरावासाठी हक्काची ठिकाणे आहेत.
केली जात आहे. खेळाडूंसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेवर अतिक्रमणे वाढत असून त्याठिकाणी असामाजिक घटकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे लहान खेळाडूंना, विशेषतः महिलांना या ठिकाणी सरावासाठी जाताना लागत आहे.
प्रशासनाने निव्व्ल कागदी घोडे न नाचवता या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी आणि खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि स्वच्छ मैदाने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.
