इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगचे दर कमी करण्याचे मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांचे संकेत

राज्यात महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगचे जाळे उभारण्यात येत आहे. ही वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी असली तरीही चार्जिंगचा दर प्रति युनिट २२ रुपये असणार आहे. हा दर कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
एका मोबिलिटीच्या सहा उत्पादन प्रकल्पाचे ऑनलाईन उदघाटन झाले त्यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, राज्यात महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगचे जाळे उभारण्यात येत आहे. प्रति युनिट २२ रुपये दर आकारण्यात येणार आहे. मात्र राज्य सरकारने सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रति युनिट ५ रुपये दर करावा आणि त्यानंतर रात्री प्रति युनिट ८ ते १० रुपये अकरावा अशी सूचना गडकरी यांनी केली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सूचनेचा अनुषंगाने राज्य सरकार पावले उचलत असून चार्जिंगचे दर कमीतकमी आकारण्यात येतील. त्याचबरोबर राज्यात चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यासाठी राज्य सरकार आवश्यक जागा, परवानग्या, आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. त्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडा तयार केल्याचे ते म्हणाले.






