ब्रेकिंग न्यूज

सोशल मीडियावर E20 इंधनावर पोस्ट कराल तर… न्यायालयाकडून नितीन गडकरींची मागणी मान्य

Share

नवी दिल्ली- कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाविरोधात सोशल मीडियावर आंदोलन उभे केले जात आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांना ट्रोल केले जात आहे. त्या विरोधात नितीनगडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आता ई२० इंधनावरून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस धाडण्यास परवानगी दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची एकच चर्चा आहे. या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता सोशल मीडियावर नवी चळवळ उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन चळवळीलाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ई२० इंधनाविरोधात पुकारण्यात आलेल्या या व्हर्च्यूअल आंदोलनात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. ‘E20 जनता पार्टी‘ नावाच्या सोशल मीडिया खात्याला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. ई२० इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होते, असा दावा केला जातोय.

इंधनात २० टक्के इथेनॉल (E-20) मिसळल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा करत सोशल मीडियावर गडकरी यांच्यावर तीव्र टीका केली जात आहे. तसेच आपल्या मुलाच्या इथेनॉल कारखान्याला फायदा पोहोचवण्यासाठी गडकरी या धोरणाचे समर्थन करत असल्याचा आरोपही केला जात आहे. ई २० इंधनासंदर्भात नितीन गडकरींच्या विरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्ट पडत आहेत.

या पोस्टमुळे नितीन गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने आता ई२० इंधनावरून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस धाडण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार मेटा, गूगल, डीपफेक एआय कंटेंट पसरवणाऱ्याविरोधात कारवाई होणार आहे. म्हणूनच आता ई२० इंधनाविरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले की, धोरणात्मक निर्णयाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि वैयक्तिक बदनामीविरोधात केंद्रीय मंत्री दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात. केंद्र सरकारच्या इंधन धोरणाचा भाग असलेल्या या निर्णयाचा आणि गडकरी यांच्या वैयक्तिक भूमिकेचा चुकीचा संबंध जोडून समाजमाध्यमांवर गैरसमज पसरवले जात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

‘E20 जनता पार्टी‘

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता सोशल मीडियावर नवी चळवळ उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन चळवळीलाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ई२० इंधनाविरोधात पुकारण्यात आलेल्या या व्हर्च्यूअल आंदोलनात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. ‘E20 जनता पार्टी‘ नावाच्या सोशल मीडिया खात्याला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. ई२० इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होते, असा दावा केला जातोय.

E-20 पेट्रोल मुद्द्यावरून आंदोलन उभारण्याची तयारी

‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याला आम आदमी पक्षाने (AAP) तरुणांचा आणि देशातील जनतेचा मोठा विजय मानला आहे. या यशाने प्रेरित होऊन आता आम आदमी पक्षाने वाहनधारकांच्या जिव्हाळ्याच्या E-20 पेट्रोल (Ethanol Blended Petrol) या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. आप पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर येत्या शनिवारी विशेष ‘टाउन हॉल’ बैठक बोलावल्याची घोषणा केली.