‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचा पास आता ऑनलाइन मिळणार

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचा पास आता ऑनलाइन मिळणार
Share

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचा पास आता ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांना आता एसटी बस आगारात जाऊन हस्तलिखित पास काढण्याची गरज नाही.

एसटी महामंडळाने २९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या योजनेअंतर्गत हा पास ४ दिवस आणि ७ दिवस अशा दोन्ही मुदतीसाठी उपलब्ध असणार आहे. घरबसल्या महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (Website) किंवा मोबाईल ॲप्लिकेशनवरून हा पास काढता येईल.

ऑनलाइन पासवर क्यूआर कोड दिला जाईल. प्रवासादरम्यान बसमधील कंडक्टरच्या ईटीआयएम (ETIM) मशीनद्वारे तो स्कॅन केला जाईल. हा पास मोबाईलमध्ये पीडीएफ (PDF) स्वरूपात किंवा प्रिंट काढून दाखवता येतो. साधारण बसेसपासून ते शिवशाही व ई-बसपर्यंतच्या विविध प्रकारच्या प्रवासासाठी याचे दर ठरलेले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही MSRTC अधिकृत संकेतस्थळ भेटू शकता.

Vedh News