पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
Share

पुणे – काम देण्याच्या नावाखाली महिलेला हॉटेलमध्ये बोलावले. तेथे तिला पाण्यातून गुंगीचे औषध देवून तिच्यावर दोघांनी सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज भागातून समोर आला आहे. या प्रकरणी एका २४ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नितीन भीमराव दहिवळ (रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि गणेश जानकीराम मेटकरी (रा. धायरी फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना कात्रज मधील सिल्व्हर स्टार लॉज येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या आजीकडे राहिला आल्या आहेत. त्यांनी नितीन दहीवळ याला कामासाठी विचारणा केली होती. त्यावर त्याने चांगले काम देतो, तू माझ्यासोबत चल, असे म्हणू लागला. तेव्हा २४ सप्टेंबर रोजी दुपारी त्या नितीन दहीवळबरोबर कात्रज येथील सिल्वर स्टार लॉजमध्ये गेल्या. तेथे नितीनचा मित्र गणेश मेटकरी हा भेटला.

त्यांनी पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळुन फिर्यादीला पिण्यास दिले. त्यानंतर कामाबद्दल बोलायचे असल्याचे सांगून फिर्यादींना रुमवर नेले. तेथे फिर्यादीला धमकावुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गणेश मेटकरी याने जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगू नका, अशी धमकी पीडित महिलेला दिली.

या घटनेनंतर त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र त्यांच्या मैत्रिणीने ही गोष्ट फिर्यादीच्या बहिणीला सांगितली. तिने फिर्यादीच्या आईला सांगितल्यानंतर घरच्यांनी तिला विश्वास दिल्याने त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असून दोघा आरोपींचा शोध घेत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली.

Vedh News