ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून ४ लाखांची रोकड अन् दुचाकी पळवली ; पिंपरी मधील घटना

ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून ४ लाखांची रोकड अन् दुचाकी पळवली ; पिंपरी मधील घटना 
Share

पिंपरी- दुकान बंद करून घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून पाच अज्ञात तरुणांनी तब्बल चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी लुटून नेली. ही घटना पिंपरीतील शगुन चौक परिसरात गुरुवारी (दि.२९) रात्री घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. ही घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

किशन धामेजा असे लुटल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. रात्री दुकान बंद करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. त्यानंतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी जबरदस्तीने लुटून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या लुटीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांना लक्ष्य करून घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

Vedh News