स्वातंत्र्याचा पहिला लढा बिरसा मुंडा यांनी दिला! – पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी-‘सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी आपल्या देशातील पहिला लढा भगवान बिरसा मुंडा यांनी दिला!’ असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी शाहीर योगेश रंगमंच, अनुदानित आश्रमशाळा अर्थात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गौरव दिवस आणि…
