उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मीला बाबर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे संपन्न झाले . या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तृतीयपंथीय समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक स्वीकार यावर भर देत मनोगत…
