दापोडी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते कामगार नेते इरफान सय्यद यांची घटनास्थळी भेट
पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. विषारी दारूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते कामगारनेते इरफान सय्यद यांनी सदर कुटुंबियांची भेट घेतली आणि घटना घडलेल्या परिसरात भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला.
दारू हे समाजाला लागलेले ग्रहण आहे, हे ग्रहण सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे यावेळी आवाहन उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या बांधवांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल हा विश्वासही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

