शिरूर – शिरूरकडून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर धावत्या ट्रकमधून चालकाने उडी मारल्याची थरारक घटना शिरूर जवळील अन्नापुर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरकडून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने अन्नापूर परिसरात धावत्या ट्रकमधून अचानक उडी मारली. चालकाने उडी मारताच ट्रकवरील ताबा सुटला आणि सुसाट वेगाने जाणारा ट्रक थेट एका स्थानिक नागरिकाच्या घरावर जाऊन आदळला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली मात्र या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
