केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात दोन दिवस वाहतूक बदल

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता. १६) शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ राहणार असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, जिल्हा परिषद, नेहरू मेमोरियल हॉल, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी दौऱ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता. १६) दोन्ही दिवस खालील रस्त्यावर ‘नो पार्किंग’ करण्यात आलेले आहे.
टेक्निकल एअरपोर्ट ते विमाननगर, रामवाडी, एबीसी चौक ते भारत फोर्ज कंपनी. नॉर्थ मेन रस्ता, जहाँगीर चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते बोपोडी हॅरिस पूल. संचेती चौक, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता. इंजिनिअरिंग कॉलेज चौक, शाहीर अमर शेख चौक, जिल्हा परिषद ते नेहरू मेमोरियल चौक.
जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक चौक ते टिळक रस्ता. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सिमला ऑफिस चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी, सादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोल्फ क्लब आणि ५०९ चौक ते टेक्निकल एअरपोर्ट.
सोमवारी (ता. १६) सकाळी नऊपासून लोकमान्य टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही चौक, पेरूगेट चौकी, भरत नाट्य मंदिर ते भारत इतिहास संशोधक मंडळ. ‘नो पार्किंग’ झोन असणार आहे.
सोमवारी (ता. १६) सकाळी सातपासून किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक, आणि दोराबजी मॉल ते ब्लू नाईल चौक या मार्गावरील वाहतूक बंद ठेण्यात आली असून त्याऐवजी जीपीओ किंवा ब्लू नाईल हॉटेल चौक हा पर्यायी मार्ग असणार आहे.
मान्यवरांसाठी वाहनतळ – एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक ते एसबीआय लेन आणि इस्कॉन मंदिर ते ब्लू नाईल चौक.






