एक पणती दादांसाठी.. दहा हजार पणत्यांनी उजळला बारामतीचा सनसेट पॉंईंट

एक पणती दादांसाठी.. दहा हजार पणत्यांनी उजळला बारामतीचा सनसेट पॉंईंट
Share

बारामती- दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे प्रत्येक बारामतीकराला अजितदादांची उणीव जाणवत आहे. बारामतीच्या सनसेट पॉईंटवर दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘एक पणती दादांसाठी… असंख्य आठवणी त्यांच्या कार्यासाठी…’ हा भावपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाला बारामतीकरांनी एकत्र येऊन सुमारे १० हजार पणत्या पेटवून सनसेट पॉईंट उजळून टाकला. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात बारामतीकर आणि उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. प्रत्येकवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अजितदादा बारामतीकरांच्या भेटीसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत उपस्थित असायचे. सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत दादा सर्वाना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचे.

मात्र यंदा दिवाळी पाडवा दादांशिवाय साजरा होत असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार, अजितदादांच्या भगिनी विजया पाटील, ऋतुजा जय पवार, यांच्यासह पवार कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

 

View this post on Instagram

 

A post shared by UpSkyFilms (@upskyfilms)

Vedh News