दिवाळीत पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत १०२ ठिकाणी आगीच्या घटना

दिवाळीत पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत १०२ ठिकाणी आगीच्या घटना
Share

पिंपरी- एकीकडे दिवाळीचा आनंद असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजन या दोन दिवसांत या दोन दिवसांत १०२ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ७६, तर गोवर्धन पूजनाच्या दिवशी २६ घटनांची नोंद झाली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकारी व्येंकटेश दुर्वास यांनी दिली.

महापालिका अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या ७६ घटनांमध्ये घर, फ्लॅट आणि दुकानांना आग लागण्याच्या २० घटनांचा समावेश होता. मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागण्याच्या सर्वाधिक ५० घटना घडल्या. तर फ्लेक्स, कंपाउंड, वाहने आणि टॉवरला आग लागण्याच्या सहा घटना नोंदविण्यात आल्या.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. शहरातील नियमित १० अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त महत्त्वाच्या १२ ठिकाणी अग्निशमन वाहने आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. एकूण ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या विशेष नियोजनामुळे आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली असल्याचे दुर्वास यांनी सांगितले.

Vedh News