इंद्रायणीनगर भोसरी येथील नाना नानी पार्क मित्र मंडळाच्या वतीने रंगली सुरेल दिवाळी पहाट

पिंपरी – गगन सदन तेजोमय, घनश्याम सुंदरा, हिच आमची प्रार्थना, वेदांनाही नाही कळला.. अशा एकसे एक सुरेल गाण्यांनी भोसरीकरांची दिवाळी पहाट संगीतमय झाली. निमित्त होते इंद्रायणीनगर भोसरी येथील नाना नानी पार्क मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. ७) दिवाळी पहाट निमित्त बेरंगे द बँड मुंबई या ग्रुपच्या संगीतमय कार्यक्रमाचे.
मुंबईच्या या कलाकारांनी भजन, भावगीत,भक्तीगीत, अभंग, लावणी, गोंधळ अशी वेगवेगळ्या ढंगाची बहारदार गीते सादर करीत उपस्थित शेकडो रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायिका साक्षी लोकरे, गायक रोशन कदम, ओंकार पवार, देवदास जगताप यांनी आपल्या आवाजाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे निवेदन महेश राऊत यांनी केले. इंद्रायणीनगर येथील वॉकिंग सर्कल ग्राउंड येथे पहाटे साडेपाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नाना नानी पार्क मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकातदादा रासकर, सचिव मधुकर गुंजकर, खजिनदार अशोक तनपुरे, कार्याध्यक्ष माणिक पडवळ, समन्वयक प्रकाश सोमवंशी, उपाध्यक्ष रमेश साळुंखे, भरत सातपुते, रंगनाथ गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब रुपनवर, सहसचिव बशीरभाई, सहखजिनदार वसंत अडसूळ, उपकार्याध्यक्ष विजय खळदकर, सल्लागार विठ्ठल माने, संजय शेंडे, राजेंद्र शेळके, मारुती गायकवाड, विजय भिलवडे, संदीप इंगळे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अश्विनी वाबळे, तुषार सहाणे, डॉ सुहास कांबळे, नम्रता लोंढे, माजी नगरसेवक विलास मडिगेरी, संजय वाबळे, विक्रांत लांडे, डॉ. अनु गायकवाड, उद्योजक मुकुंद आवटे, संजय उदावंत, मुरलीधर साठे, योगेश लोंढे, संजय आहेर, राजेंद्र शेळके, प्रा. दिगंबर ढोकले, सचिव मधुकर गुंजकर, खजिनदार अशोक तनपुरे, कार्याध्यक्ष माणिक पडवळ, समन्वयक प्रकाश सोमवंशी, उपाध्यक्ष रमेश साळुंखे, भरत सातपुते, रंगनाथ गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब रुपनवर, सहसचिव बशीरभाई, सहखजिनदार वसंत अडसूळ, उपकार्याध्यक्ष विजय खळदकर, सल्लागार विठ्ठल माने, संजय शेंडे, राजेंद्र शेळके, मारुती गायकवाड, विजय भिलवडे, संदीप इंगळे तसेच मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना नानी पार्क मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.






